साडेसतरा नळी येथे नागरी वस्तीत बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:30+5:302021-07-17T04:10:30+5:30
हडपसर : हडपसरजवळील साडेसतरानळी येथे गेले तीन दिवस बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहून काळजी घेण्याचे आवाहन ...
हडपसर : हडपसरजवळील साडेसतरानळी येथे गेले तीन दिवस बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक राहून काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. बिबट्या फिरताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आमदार चेतन तुपे यांनी वनविभागाकडे या नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी तुपे यांना बिबट्याच्या वावराचे अस्तित्व जाणवून देणारे पायाच्या ठशांचे फोटो पाठवले. हे फोटो चेतन तुपे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून दिले.
तुपे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासमवेत बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी करण्यात आली. त्यावेळी या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसात या भागातील कुत्री कमी झाल्याचे सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने बिबट्या रात्री कुत्र्यांची शिकार करून त्यांना झाडीमध्ये ओढून नेत असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही वेळानंतर लगेच या परिसरात फिरणाऱ्या बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
शेतात काम करत असताना शक्यतो खाली बसून काम करू नये व आपल्या जवळील मोबाईलमध्ये मोठ्याने गाणी लावावीत. जेणेकरून आवाजामुळे बिबट्या त्या भागात फिरकणार नाही, अशाही सूचना वनविभागाने केलेले आहेत.