लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 08:25 PM2020-07-21T20:25:35+5:302020-07-21T20:28:04+5:30

प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान कंपन्या व रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

Less of 50 percent Passengers arriving in pune due to lockdown | लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली

लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संख्या निम्म्याने घटली

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर २५ मे पासून पुणे विमानतळावरून विमानांची ये-जा सुरू

पुणे : लॉकडाऊन काळात पुण्यात रेल्वे व विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. तसेच जाणारे प्रवासीही कमी झाले आहेत. प्रवासी संख्या कमी झाल्याने विमान कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
देशातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर दि. २५ मे पासून पुणे विमानतळावरून विमानांची ये-जा सुरू झाली. पहिल्या दिवशी केवळ २६ विमानांची ये-जा झाली. पण त्यानंतर हा आकडा ५० पर्यंत वाढत गेला. तसेच प्रवासी संख्याही वाढली. पुण्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येसह विमान उड्डाणेही कमी झाली. त्यानंतर विमान उड्डाणे वाढली तरी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांमध्ये निम्म्याने घट झाल्याचे दिसते. बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे चित्र आहे. पुणे विमानतळाचे संचालक कुलदीप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २०) पुण्यात २२ विमाने उतरली असून  त्यामध्ये ८७६ प्रवासी होते. तर विविध शहरांकडे उड्डाण केलेल्या २२ विमानांमधून १६१५ प्रवासी गेले. दि. १० जुलै रोजी प्रवाशांची संख्या अनुक्रमे १६५५ व २४६३ एवढी होती.


पुणे रेल्वे स्थानकातून दररोज पुणे-दानापुर (पटना) एक्सप्रेस ये-जा करते. पुण्यात लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी या गाडीने पुण्यात सुमारे एक हजार प्रवासी येत होती. ही संख्या आता ५५० ते ६०० पर्यंत खाली आली आहे. तसेच जाणाऱ्यांच्या संख्येत सुमारे २० टक्क्यांनी घट झाली आहे. गोवा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, कोनार्क एक्सप्रेस, गडग एक्सप्रेस या गाड्यांनी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही २० ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. लॉकडाऊनमध्ये शहरात केवळ अत्यावश्यक वाहतुकीला परवानगी आहे. त्यामुळे प्रवासासाठी वाहने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक जण प्रवास रद्द करत असल्याचे चित्र आहे.
------------------------
पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या (कंसात विमान संख्या)
दि. १० जुलै दि. २० जुलै
जाणारे २४६३ (२४) १६१५ (२२)
येणारे १६५५ (२३) ८७६ (२२)
------------------
रेल्वेची प्रवासी संख्या
सध्या लॉकडाऊनपुर्वी
पुणे-दानापुर एक्सप्रेस - येणारे ५५०-६०० ९००-१०००
जाणारे ११५०-१२०० १३५०-१४००
---------------------------------------------------

Web Title: Less of 50 percent Passengers arriving in pune due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.