कंत्रटी कामगारांना निम्माच पगार

By Admin | Published: December 7, 2014 12:37 AM2014-12-07T00:37:22+5:302014-12-07T00:37:22+5:30

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण व आरोग्य विभागात काम करीत असलेल्या कंत्रटी कामगारांना ठेकेदारांकडून निम्माच पगार दिला जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे

Less than half the salary for contract workers | कंत्रटी कामगारांना निम्माच पगार

कंत्रटी कामगारांना निम्माच पगार

googlenewsNext
पुणो : महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण व आरोग्य विभागात काम करीत असलेल्या कंत्रटी कामगारांना ठेकेदारांकडून निम्माच पगार दिला जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ठेकेदाराच्या महापालिकेशी झालेल्या करारानुसार कामगारांना सरासरी 12 हजार रुपये पगार देणो अपेक्षित असताना त्यांची 5 हजार रुपयांवरच बोळवण करण्यात येत आहे.
पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयात साधारणता 4 हजार कंत्रटी कामगार कार्यरत आहेत. त्यातील बहुसंख्य कामगारांना कराराप्रमाणो वेतन दिले जात नाही. याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. कामगारांना पगाराच्या दिलेल्या धनादेशाच्या प्रतीही कुमार यांना देण्यात आल्या आहेत. पालिकेने कंत्रटी कामगार पुरविण्याचे विविध कंपन्यांना ठेके दिले आहेत.  
कामगारांना शासकीय सुटय़ा देणो अपेक्षित असतानाही त्या दिल्या जात नाहीत. त्यांच्या कामाची वेळ 1क् ते 6 असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. त्याचा कोणताही ओव्हरटाइम त्यांना दिला जात नाही. त्यांनी सुटय़ा घेतल्यास त्यांचा पगार कापला जातो. कंत्रटी कामगारांना ठेकेदाराने आरोग्य सुविधा पुरविणो आवश्यक असतानाही त्या दिल्या जात नाहीत. या प्रकाराची आयुक्तांनी सखोल चौकशी करून, नियमबाहय कामे करणा:या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच त्यांच्याकडून पैसे वसूल करून कामगारांना त्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
 
415 क्षेत्रीय कार्यालयात 4 हजार कंत्रटी कामगार कार्यरत आहेत. त्यातील बहुसंख्य कामगारांना कराराप्रमाणो वेतन मिळत नाही. याबाबत पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मनपा कामगारांना दिलेल्या पगाराच्या धनादेशाच्या प्रतीही आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. पालिकेने कंत्रटी कामगार पुरविण्याचे विविध कंपन्यांना ठेके दिले आहेत.  

 

Web Title: Less than half the salary for contract workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.