मुळशीत शेतकरी संपाला अल्प प्रतिसाद
By admin | Published: June 3, 2017 02:44 AM2017-06-03T02:44:08+5:302017-06-03T02:44:08+5:30
मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून संपास अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मार्केट यार्डवरून भाजीपाला खरेदी करून
लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून संपास अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मार्केट यार्डवरून भाजीपाला खरेदी करून आणणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्केट यार्डात भाजीपाल्याची टंचाई भासत असली तरी स्थानिक शेतकरी पौड, पिरंगुट व घोटावडे फाटा येथील बाजारपेठेत आपला शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला मिळण्यात कोणतीही अडचण होताना दिसत नाही.
मुळशीत सध्या आंबा विक्रीचा हंगाम असून सध्या पावसाला सुरुवात झालेली असल्याने आपला आंबा खराब होण्याचे भीतीने आंबा उत्पादक मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आणत आहे. तसेच बंद पिशवीतील दूध पुरवठा काही प्रमाणात खंडित झाला असला तरी स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी होताना दिसून येत आहे.
दरम्यान कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी व शेतकरी संपाला आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी पक्षाने ३ जून रोजी सकाळी सुप्रिया सुळे व जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत घोटावडे फाटा येथे रास्ता रोकोचे आयोजन केले आहे.