Pune Corona Update: दिलासादायक! पुण्यात एक महिन्यानंतर रुग्णसंख्या हजारपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:43 IST2022-02-07T19:43:03+5:302022-02-07T19:43:15+5:30
तिसरी लाट ओसरत असल्याचे वैैद्यकतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Pune Corona Update: दिलासादायक! पुण्यात एक महिन्यानंतर रुग्णसंख्या हजारपेक्षा कमी
पुणे : जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आणि तिस-या लाटेला सुरुवात झाली. शहरात ४ जानेवारीपासून रुग्णसंख्येने १००० चा टप्पा ओलांडला. २० जानेवारी रोजी ८००० हून अधिक रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला. आता तिसरी लाट ओसरत असून तब्बल एका महिन्यानंतर रुग्णसंख्या १००० पेक्षा कमी झाली आहे. सोमवारी शहरात ७७६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
एकूण ५ हजार ६५७ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ७७६ कोरोनाबाधितांचे निदान झाले. यादिवशी ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैैकी २ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १३ हजार ६६ इतकी कमी झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैैकी ६.३५ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैैकी ७५ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर २२८ रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १३.७१ टक्के इतका आहे.
शहरात आजवर ४३ लाख ९८ हजार २८० कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५२ हजार २९२ कोरोनाबाधित आढळून आले. ६ लाख २९ हजार ९२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरात ९३०४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या शहरात ४६६ व्हेंटिलेटर बेड, तर ४००४ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तिसरी लाट ओसरत असल्याचे वैैद्यकतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.