उमाजी नाईकांच्या इतिहासातून स्वातंत्र्य व समतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:11+5:302021-02-06T04:17:11+5:30
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील कै. सोमनाथ कुंभार व कै. विनोद जाधव यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक व स्पर्धा परीक्षा ग्रंथालयात आद्यक्रांतिवीर ...
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील कै. सोमनाथ कुंभार व कै. विनोद जाधव यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक व स्पर्धा परीक्षा ग्रंथालयात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ग्रंथालय समितीचे नूतन अध्यक्ष नारायण वाघमोडे, नितीन निगडे, संतोष जाधव, तानाजी भंडलकर, किशोर गोरगल, निखिल खोमणे, छगन नलवडे आदी उपस्थित होते. तानाजी भंडलकर व नितीन निगडे यांनी प्रतिमापूजन केले.
चव्हाण म्हणाले की, सलग १४ वर्षे लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे, तसेच सरकारविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध करणारे बुद्धिजीवी तसेच प्रसंगी दोन हात करून स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणाची आहुती देणारे उमाजी नाईक यांचा इतिहास म्हणजे शौर्यगाथा आहे. नारायण वाघमोडे म्हणाले की, ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध परीक्षांची पुस्तके उपलब्ध करण्यात येत असून विद्यार्थी मित्रांनी पुस्तकांचा लाभ घ्यावा. तानाजी भंडलकर यांनी प्रास्ताविक केले, तर आभार निखिल खोमणे यांनी मानले.