शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:11+5:302021-07-29T04:10:11+5:30
शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण केल्याने जमिनीमधील अन्नघटकांचे प्रमाण व जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती मिळणे शक्य होते. रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या ...
शास्त्रीय पद्धतीने माती परीक्षण केल्याने जमिनीमधील अन्नघटकांचे प्रमाण व जमिनीच्या आरोग्याविषयी माहिती मिळणे शक्य होते. रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या जयश्री मनोहर मोहरे हिने शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी माहिती दिली. माती परीक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत पीक वाढीसाठी तसेच आवश्यक घटकांची कमतरता भरून काढणे हा आहे. जमिनीत गरजे इतकेच खतांचे प्रमाण शेतकऱ्यांनी वापरावे. कंपोस्ट खते व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे तसेच आलटूनपालटून पिके घेतल्यास जमिनीचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते, असेही जयश्री मोहरे यांनी सांगितले.
मातीचा नमुना कसा घ्यावा? कसा घेऊ नये? मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी काय करावे? आवश्यक अन्नघटक व त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे याविषयी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी शांताराम काळे, अशोक काळे, विकास पाचारणे, विजय काळे, सीमा काळे, अशा काळे हे शेतकरी उपस्थित होते.