डीएड प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:38+5:302021-09-12T04:15:38+5:30
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. राज्य ...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. राज्य मागील वर्षी ३२ हजार जागांवर केवळ ४० टक्के म्हणजे १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला होता. त्यामुळे दिवसेंदिवस डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली असून, यंदा त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यंदा प्रवेशाच्या पहिल्या फेरीतून ३ हजार २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
डीएड प्रवेशाची दुसरी फेरी सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना येत्या १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे, तसेच प्रवेशाची तिसरी फेरी १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात १ हजार ८६० जागांसाठी केवळ ५२८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३०० जागा रिक्त राहणार आहेत.
--------------------------------------
पुण्यातील डीएड प्रवेशाची आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण कॉलेज : २७
एकूण प्रवेश क्षमता : १ हजार ८६०
प्रवेशासाठी प्राप्त झालेले एकूण अर्ज : ५२८
शासकीय कॉलेज मधील प्रवेश १५३
खासगी कॉलेजमधील प्रवेश : १०३
पहिल्या फेरीतून झालेले एकूण प्रवेश २५६
-----------------------------------------