डोकलाम संघर्षामुळे चिनी वस्तूंकडे युवकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:37 AM2017-08-06T04:37:20+5:302017-08-06T04:37:20+5:30
तुझ्या आपुलकीने बहरावे हे क्षण मैत्रीचे...धुंद होऊन दरवळावे हे क्षण मैत्रीचे... आठवणीत हळुवार जपावे हे क्षण मैत्रीचे... जगण्याचा हा प्रवास असाच चालत राहावा मैत्रीच्या रुपात...
बारामती : तुझ्या आपुलकीने बहरावे हे क्षण मैत्रीचे...धुंद होऊन दरवळावे हे क्षण मैत्रीचे... आठवणीत हळुवार जपावे हे क्षण मैत्रीचे... जगण्याचा हा प्रवास असाच चालत राहावा मैत्रीच्या रुपात... अशा विविध कवितारूपी शुभेच्छांनी रविवारी (दि. ६) ‘फें्रडशिप डे’ साजरा होत आहे. त्यासाठी बारामतीतील दुकाने सज्ज झाली आहेत. बारामतीतील तरुणाई अतिशय उत्साहाने आपल्या मित्रांसाठी फेें्रडशिप बँडसह विविध वस्तूंची खरेदी करीत आहेत. मात्र, सध्या भारत आणि चीन यांच्यात डोकलाम प्रश्नावरून संघर्ष निर्माण झाल्यामुळे चिनी वस्तू खरेदी करण्याकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. चिनी वस्तूंना बगल देत यावर्षी भारतीय तसेच तुर्की, इटली, थायलंडच्या चॉकलेट वस्तूंचा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. मंदीतही या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.
आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार ‘फें्रडशिप डे’ म्हणून साजरा केला जातो. खास तरुणाईच्या आवडत्या सणासाठी बारामतीतील दुकाने सज्ज झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी बारामती तरुणाई तितक्याच उत्साहाने कॉलेज कट्ट्यावर आपल्या मित्रांबरोबर हा दिवस साजरा करताना दिसतील.
यावर्षीच्या ‘फें्रडशिप डे’साठी मॅजेस्टिकमधील बाजारपेठेत विविध भेटवस्तू उपलब्ध आहेत. चॉक लेट्स, फुले, रंगीत बँण्डस बरोबरच मॅग्नेटिक ग्लास, की चेन, पेन स्टँड, ब्रेसलेट, स्माईली मग, पेपर बॅग, फ्रिज मॅग्नेट टेडी, लिटील बुक आॅफ फ्रेंडशिप कोटेशन, कॉफी मग, वॉटर ग्लोब, वुडन फ्लेम, कॅलेंडर, स्माईली मग्स, चॉकलेट बुके, टेडीवेअर, सॉफ्ट टॉईज, वेगवेगळे थम रिंग्स, लकी बॉटल्स, लखोटे, ग्रिटिंग्ज, घड्याळे, फें्र डशिप पिलोज, फें्रड्स कपलिंग्स, फे्रंडशिप्स पेंडंट, म्युझिकल फ्लॉवर्स, किचेन्स, ब्रोच, गिफ्ट बॅग्स,प्लॅस्टिकचे गुलाब, तर चॉकलेटमध्ये विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बाहुबली चित्रपटासह ट्यूबलाईट चित्रपटाशी संबंधित फेंडशिप बेल्ट यंदा उपलब्ध आहेत, अशी माहिती व्यावायिक राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बारामतीतील तरुणांचा उत्साह वाखाणण्यासारखा असतो. अगदी आठवडाभर आधीच फें्रडशिप बँड खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. यंदाचे खास आकर्षण म्युझिकल फ्लॉवर्स, शुभेच्छा देणारे मॅग्नेटिक ग्लास आहे.
यामध्ये ‘फे्रंड्स फ ॉंरेव्हर’ लिहिलेला संदेश आहे. ५०० ते ७०० रुपयांपर्यंत असणारे ही फूल आणि हार्टच्या आकारात उपलब्ध आहेत.
सोशल मीडियाच्या प्रभावातही ग्रीटिंग कार्डचे अस्तित्व
सर्वांचे आवडते ग्रीटिंग्ज कार्ड या सोशल मीडियाच्या प्रभावातही आपले अस्तित्व टिकूू न आहेत. आजच्या जगात खरी मैत्री असणे दुर्मिळ आहे... असं जग म्हणतं... त्या... जगाने कुुठे आपलं नातं अनुभवलंय... मैत्री माझ्या जगण्याचा आधार... मैत्री मनाचे धागे जोडणारे नाते... जगण्याचं गाणं अजून सुंदर करण्यासाठी... मैत्रीची सोबत लाभली, आणि जगणं सुंदर चित्रासारखं बदलून गेलं, असे मैत्रीचे अनेक संदेश देणारी ग्रीटिंग उपलब्ध आहेत.
चिनी मालाचे वर्चस्व संपुष्टात
युवकांचे आकर्षण असणाºया ‘फ्रेंडशिप डे’वरचे
चायनिज बाजारपेठेचे वर्चस्व संपुष्टात आल्याचे यंदाचे चित्र आहे. चायनाने आणलेल्या विविध वस्तूंना ‘मेड इन चायना’ नको, असे युवावर्गाने सांगितल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यावर्षी लहान मुलांसाठी बेन १० आणि छोटा भीम, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेले बॅड उपलब्ध आहेत.