जनावरांना रोगमुक्त करू या!
By admin | Published: April 10, 2015 05:32 AM2015-04-10T05:32:57+5:302015-04-10T05:32:57+5:30
महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आजपासून (१0 एप्रिल) जनावरांसाठी लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाणार असून,
पुणे : महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात आजपासून (१0 एप्रिल) जनावरांसाठी लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, ८ लाख २३ हजार डोस दिले जाणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धनच्या सभापती अॅड. सारिका इंगळे यांनी दिली.
१० एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ही मोहीम असून, आतापर्यंत ८ वर्षांत १९ वेळा हे लसीकरण करण्यात आले आहे. वर्षातून दोन वेळा १ रुपया सेवाशल्क घेऊन हे लसीकरण केले जाते. जिल्हा परिषदेचे २२७ व राज्य शासनाचे ९९ असे जिल्ह्यात ३३६ दावाखाने असून, ८ लाख २३ हजार डोसचा पुरवठा येथे करण्यात आला आहे. लाळखुरकत रोगामुळे दूध उत्पादनात घट होते. वंधत्व येते, कायमस्वरूपी धाप लागते व जनावर निकामी होते. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. यामुळे हे लसीकरण करणे गरजेचे आहे.
सध्या उन्हाच्या झळा लागत असून, या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी हे लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्यके गावात, वाडी-वस्तीवर जाऊन डॉक्टर जनावरांना लसीकरण करणार आहेत. पशुपालकांना याचे महत्त्व पटावे, त्यांनी आपल्या जनावरांना हा डोस द्यावा, यासाठी डॉक्टर येण्याच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतील पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. दवंडी देऊन लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)