कोरोना संकट टळू दे पुढील वर्ष आनंदात जाऊदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:47+5:302021-01-03T04:12:47+5:30
संकष्टी चतुर्थी : भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी पुणे : कोरोना विषाणूने जगभरातील सर्व गोष्टींचे प्रचंड नुकसान केले आहे. आता ...
संकष्टी चतुर्थी : भाविकांची बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी
पुणे : कोरोना विषाणूने जगभरातील सर्व गोष्टींचे प्रचंड नुकसान केले आहे. आता हे संकट टळू दे नवीन वर्ष आनंदात जाऊदे. अशी प्रार्थना करून वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने देवाची दारेही बंद करावी लागली. जगभरात अनेक क्षेत्र, उद्योगधंदे, व्यवसाय डबघाईला आले. असंख्य नागरिक मृत्यमुखी पडले. २०२० च्या अखेरीस रुग्णसंख्या आटोक्यात आली. नवीन वर्षाला कोरोना पूर्णपणे नष्ट होउदे अशी प्रार्थना नागरिकांनी बाप्पाच्या चरणी केली.
यंदा वर्षाच्या दुसऱ्या दिवशीच चतुर्थी आली. भाविकांनी दर्शनासाठी दगडूशेठच्या आवारात गर्दी केली होती. सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मंदिराच्या समोरही नागरिक दर्शन घेत होते. असंख्य भाविक फोटो काढण्यातही मग्न झाले होते. शिवाजी रस्ता रहदारीचा असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीही झाली होती.
---
वर्ष २०२० वाईट गेले आहे. पण ह्या वर्षाने खूप काही शिकवलं. आता त्या शिकवणुकीचा वापर करून नव्याने सुरुवात करायची आहे. कोणतेही शुभ कार्य बाप्पाच्या दर्शनाने सुरू केले की त्यात विघ्न येत नाही म्हणून आज मी दर्शनाला आलो आहे.
- प्रकाश तोरसेकर, भाविक
---
महामारीमुळे झालेलं नुकसान भरून निघू दे, सर्वांची प्रगती होऊदे. इडा पीडा टळुदे आणि आम्हा भक्तगणांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊदे हीच प्रार्थना दगडूशेठ चरणी केली आहे.
- मयुरेश शिंदे, भाविक
(फोटो - दगडूशेठ गणपती नावाने हॅलोसिटीत आहे.)