गदिमांच्या स्मारकावरून सुरु असलेले 'ते' पेल्यातील वादळ आता संपू दे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 07:12 PM2020-12-14T19:12:52+5:302020-12-14T19:38:47+5:30

गदिमांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित काव्यजागर कार्यक्रमा आडून छुपे आंदोलन करण्यात येत असल्याचा ठपका ठेवत त्यात सहभागी होण्यास माडगूळकर कुटुंबीयांनी विरोध दर्शविला होता.

Let the storm in all quarrel end now, let's all come together for the memorial of G.D. Madgulkar ''! Anand Madgulkar | गदिमांच्या स्मारकावरून सुरु असलेले 'ते' पेल्यातील वादळ आता संपू दे..!

गदिमांच्या स्मारकावरून सुरु असलेले 'ते' पेल्यातील वादळ आता संपू दे..!

googlenewsNext
ठळक मुद्देगदिमांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात काव्यजागर..गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे अशी एकमुखी मागणी...

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये जी काही स्मारकावरून वादावादी सुरु झाली. ते पेल्यातील वादळ आता संपू दे आणि गदिमांचे स्मारक करायचे ठरले आहे तर मग सर्वांनी एकत्र येऊन मदत करूयात, असे आवाहन आनंद माडगूळकर यांनी केले. या काव्य जागर कार्यक्रमात माडगूळकर कुटुंबीय सहभागी होणार नाही असं म्हटलं गेलं होतं तरी मी महापौरांनी घोषणा करण्यापूर्वीच संयोजकांना शब्द दिला होता. तो शब्द मी पाळला. यावेळी  ‘गीतरामायणा’तील काही रचना मी सादर केल्या.   

‘घन घन  माला नभी दाटल्या, कोसळती धारा’.. महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीतील हे शब्द उच्चारताच पावसाच्या सरी कोसळू लागल्या अन गदिमांना आदरांजली वाहणारे सारे कवी, कलाकार, शाहीर, साहित्यिक मंडळी त्या आनंदात चिंब भिजले. फुलांनी गदिमांचा रेखाटलेला चेहरा..आकर्षक रंगावली.. गरूड गणपतीच्या प्रांगणात एकत्र आलेले कलावंत...अन गणेश मंदिराच्याच परिसरातच होणा-या कार्यक्रमामुळे  ‘गजानन’ माडगूळकरांचा उल्लेख करून जुळून आलेल्या योगायोगाबददल उपस्थितांकडून उमटलेल्या प्रतिक्रिया... अशा उत्साही वातावरणात गदिमांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी काव्य जागर पार पडला. यावेळी ‘गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे अशी सर्वांनी एकमुखाने मागणी केली.


       कलावंत रसिकांतर्फे गदिमा स्मारकासाठी छेडलेल्या आंदोलनवजा काव्य वाचनात शंभरहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये गदिमांचे सुपुत्र आनंद माडगूळकर,माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, शाहीर दादा पासलकर, प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मसापचे कार्यवाह बंडा जोशी, निवेदक आनंद देशमुख आणि सामान्य रसिक शशिकांत सांबा यांचा समावेश होता. त्याला इतर भाषिकांचीही जोड मिळाली. आंतरराष्ट्रीय वक्ते अनीस चिश्ती (उर्दू), स्वाती दाढे (बंगाली), हेमंत पुणेकर (गुजराती), डॉ. मंगेश कश्यप (इंग्रजी) यांनी गदिमांच्या भाषांतरित कवितांच्या सादरीकरण केले. संयोजन समिती प्रमुख प्रदीप निफाडकर, कवी मनोहर सोनावणे, प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, कवी धनंजय तडवळकर, सुप्रस्द्धि गायक अन्वर कुरेशी, बाल कवयित्री वल्लरी देशमुख, उर्मिला कराड अशा कलावंत रसिकांनी याकार्यक्रमाला चार चाँद लावले.
           दरम्यान, गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पंचवटी निवासस्थानी तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गदिमांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गदिमांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर, नातू सुमित्र माडगूळकर आणि सुनील महाजन उपस्थित होते. साहित्य परिषदेत झालेल्या कार्यक्रमामध्ये गदिमांच्या ग्रंथांचे पूजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी  माडगूळकर कुटुंबीयांसह प्रा उल्हास बापट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे, साहित्यिक न. म. जोशी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त राम कोल्हटकर,परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह
प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार,उपस्थित होते.
-----------------------------------------------------------

Web Title: Let the storm in all quarrel end now, let's all come together for the memorial of G.D. Madgulkar ''! Anand Madgulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.