Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 05:40 PM2022-08-23T17:40:46+5:302022-08-23T17:42:06+5:30

एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत १ हजार १४३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत

Let the joining be early this year MPSC students protest in Pune | Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन

Video: "जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा", पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे भीक मागो आंदोलन

googlenewsNext

पुणे : एमपीएससीच्या २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत १ हजार १४३ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर ३ वर्षांनंतरही राज्य सरकारने आमच्या नियुक्त्या केल्या नाहीत. सरकारने आमच्या सर्वांच्या नियुक्त्या कराव्यात. अशी मागणी करत पुणे जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भीक मागो आंदोलन केले. यावेळी जय गोविंदा नियुक्ती होईल का यंदा, गणपती बाप्पा मोरया यंदाच्या वर्षी जॉईनिग लवकर होऊ द्या… अशा विद्यार्थ्याकडून घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान स्पर्धा परिक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणांने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यावेळी विद्यार्थी ‘मी पण स्वप्निल लोणकर’ असे पोस्टर घेऊन उमेदवार आंदोलनात सहभागी झाले होते.  या सरकारच्या दिरंगाईमुळे स्वप्निल लोणकर या आमच्या मित्राला आत्महत्या करावी लागली. याला सरकार जबाबदार असून अजून किती स्वप्निल सारख्या उमेदवारांची आत्महत्या करण्याची हे सरकार वाट पाहणार आहेत. आमच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील उपस्थित उमेदवारांनी यावेळी दिला.

Web Title: Let the joining be early this year MPSC students protest in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.