कंत्राटी कामगार कायद्यात बदल करू

By admin | Published: January 2, 2015 11:23 PM2015-01-02T23:23:40+5:302015-01-02T23:23:40+5:30

गुंडगिरी व ठेकेदारी पद्धत मोडून काढण्यासाठी आगामी काळात लेबर कॉन्ट्रॅक्टर कायद्यात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.

Let us change the contract labor laws | कंत्राटी कामगार कायद्यात बदल करू

कंत्राटी कामगार कायद्यात बदल करू

Next

काळूस : औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली गुंडगिरी व ठेकेदारी पद्धत मोडून काढण्यासाठी आगामी काळात लेबर कॉन्ट्रॅक्टर कायद्यात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
काळूस (ता. खेड) येथे शिवमुद्रा ग्रुपची स्थापना तसेच रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिवतारे बोलत होते. आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, मंगलदास बांदल, प्रा. नितीन बानगुडे, राम गावडे, अनिलबाबा राक्षे, बाबासो धुमाळ, अतुल देशमुख, किरण मांजरे, राजू जावळेकर, शैलेश मोहिते, लक्ष्मण टोचे, बबनराव कुऱ्हाडे, प्रकाश वाडेकर, विनोद महाळुंगकर, दिलीप यादव, श्याम दाभाडे, किरण मोरे, सरपंच अर्चना टेमगिरे, उपसरपंच संतोष पोटवडे, शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष विश्वास आरगडे, उपाध्यक्ष पवनराजे जाचक, कार्याध्यक्ष शंकर वाटेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. वाढलेली गुंडगिरी, जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील एजंटगिरी यावर शिवतारे यांनी टीका केली. तसेच कामगारांसाठी त्रासदायक असणाऱ्या लेबर कॉन्ट्रॅक्टर कायद्यात बदल करणार असल्याचे सांगितले.
रखडलेले पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच आघाडीचे सरकार आणि शिवशाहीचे सरकार यातील फरक जनतेला दाखवून देणार असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. शिवमुद्रा ग्रुपच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण या वेळी करण्यात आले.
तसेच गावातील विविध गुणवंताचा सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित रक्तदान शिबिर १०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, मंगलदास बांदल, बाबा राक्षे यांनी विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन देत शिवमुद्रा ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. प्रास्ताविक केशव आरगडे यांनी केले. सूत्रसंचालन संपत टेमगिरे यांनी केले.

 

Web Title: Let us change the contract labor laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.