पुंडलिक वरदे...! चला विठुरायाच्या भेटीला; १० जूनला पंढरीची वारी, जाणून घ्या 'पालखी मुक्काम'

By श्रीकिशन काळे | Published: June 2, 2023 04:35 PM2023-06-02T16:35:19+5:302023-06-02T16:36:31+5:30

विठूमाऊली यंदा पाव रे आणि जोरदार पाऊस पाड रे, अशीच मनोकामना वारकऱ्यांच्या मनोमनी असणार

Let visit pandharpur Pandhari Vari on June 10 Know Palkhi sohala | पुंडलिक वरदे...! चला विठुरायाच्या भेटीला; १० जूनला पंढरीची वारी, जाणून घ्या 'पालखी मुक्काम'

पुंडलिक वरदे...! चला विठुरायाच्या भेटीला; १० जूनला पंढरीची वारी, जाणून घ्या 'पालखी मुक्काम'

googlenewsNext

पुणे : पंढरीची वारी म्हणजे...भक्तितत्वाचा आविष्कार...प्रेमसुखाची अनुभती म्हणजे पंढरीची वारी…याच वारीचा आनंद १० जूनपासून वारकऱ्यांना घेता येणार आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांची १० जून रोजी पालखीचे तर ११ जून रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान होणार आहे. यंदा मॉन्सूनही १० जून रोजी महाराष्ट्राच्या दारी येणार असल्याने हा पालखी सोहळा आनंदाची वारी ठरणार आहे.

जीवनातली सारी दुःख, यातना, विसरून आनंद डोह बनून आनंदतरंग अनुभवण्याची स्थिती म्हणजे पंढरीची वारी असते. या आनंदाच्या डोहात वारकरी चिंब भिजून कित्येक किलोमीटरचा प्रवास लिलया पार करत विठोबाचे दर्शन घेतात. पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर काही दिवसांतच वरूणराजाचे आगमन होत असते. यंदा मॉन्सून १० जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे पालखीचे प्रस्थानही याच दिवशी आहे. विठूमाऊली यंदा पाव रे आणि जोरदार पाऊस पाड रे, अशीच मनोकामना वारकऱ्यांच्या मनोमनी असणार आहे.

जगदगुरू संत तुकोबा महाराज पालखी

१० जून : प्रस्थान देहू
११ जून : आकुर्डी

१२,१३ जून : पुणे
१४ जून : लोणी काळभोर

१५ जून : यवत
१६ जून : वरवंड

१७ जून : उडंवडी गवळ्याची
१८ जून : बारामती

१९ जून : सणसर
२० जून : आंथुर्णे

२१ जून : निमगाव केतकी
२२ जून : इंदापूर

२३ जून : सराटी
२४ जून : अकलूज

२५ जून : बोरगाव
२६ जून : पिराची कुरोली

२७ जून : वाखरी
२८ जून : पंढरपूर

संत तुकोबा पालखीचे उभे रिंगण

- २५ जून : माळीनगर, २७ जून : बाजीराव विहीर, २८ जून : पादुका आरती
गोल रिंगण

- १९ जून : काटेवाडी, २० जून : बेलवंडी, २२ जून : इंदापूर, २४ जून : अकलूज


संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी

११ जून : प्रस्थान आळंदी

१२, १३ जून : पुणे
१४,१५ : सासवड

१६ जून : जेजुरी
१७ जून : वाल्हे

१८, १९ जून : लोणंद
२० जून : तरडगाव

२१ जून : फलटण
२२ जून : बरड

२३ जून : नातेपुते
२४ जून : माळशिरस

२५ जून : वेळापूर
२६ जून : भेंडीशेगाव

२७ जून वाखरी
२८ जून : पंढरपूर

संत ज्ञानोबा पालखीचे उभे रिंगण

- २० जून : चांदोबाचा लिंब, २७ जून : बाजीरावी विहीर, २८ जून : पंढरपूर

गोल रिंगण

- २४ जून : पुरंदवडे, २५ जून : खुडूस फाटा, २६ जून : ठाकूरबुवाची समाधी, २७ जून बाजीरावची विहीर.

Web Title: Let visit pandharpur Pandhari Vari on June 10 Know Palkhi sohala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.