‘बालगंधर्व’चे गतवैैभव परत आणणार
By admin | Published: April 25, 2017 04:17 AM2017-04-25T04:17:19+5:302017-04-25T04:17:19+5:30
सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याला बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने कलेचा वारसा लाभला आहे. मात्र, रंगमंदिरातील
पुणे : सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याला बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने कलेचा वारसा लाभला आहे. मात्र, रंगमंदिरातील अस्वच्छता, असुरक्षितता, प्रेक्षकांची गैैरसोय आदी अडचणींमुळे रंगमंदिर गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. असुविधांच्या गर्तेतून बाहेर काढून बालगंधर्व रंगमंदिराला गतवैैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या बैैठकीत करण्यात
आला.
जुलैैमध्ये रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. तत्पूर्वी, बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छता, नवी यंत्रणा, रंगीत तालमीसाठी सभागृह उपलब्ध करून देतानाच निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार विजय काळे यांनी संबंधितांच्या बैैठकीत दिली. महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्याबाबत स्थायी समिती अध्यक्षांशी सकारात्मक बोलणी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी सुनील महाजन, प्रवीण बर्वे, समीर हंपी, मोहन कुलकर्णी, प्रदीपकुमार कांबळे, शशिकांत कोठावळे, बाबा पठाण यांच्यासह विद्युत, भवन, रस्ता आणि उद्यान या विभागांचे अधिकारी बैैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)