चला स्वातंत्र्यदिनी झाडे लावण्याचे शतक करू या, मोकळ्या मैदानावर रोपं लावू या - ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचे आवाहन, सह्याद्री देवराईतर्फे राज्यभर राबवणार उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:57+5:302021-07-16T04:08:57+5:30
क्रिकेट हा आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे. पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूलाच शतक करण्याचा मान मिळतो. पण आता हा मान ...
क्रिकेट हा आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे. पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूलाच शतक करण्याचा मान मिळतो. पण आता हा मान सर्व लोकांना मिळण्याची संधी आहे. गावात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा, शाळेतील जागा, मंदिराच्या परिसरात जागा असतात. तिथं झाडं लावून आपण स्वातंत्र्यदिनी झाडांचे शतक करायचे आहे. त्यामध्ये गावातील भजनी मंडळे, गणेश मंडळ, विद्यार्थी अशा सर्वांनी सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले.
-------------------
जुनी खोडं किती?
गावात जुनी माणसं असतात. त्यांच्या अनुभवाचा लाभ आपल्याला होत असतो. पण जुनी झाडं, खोडं किती असतात. त्यांची संख्या वाढवायची आहे. झाडं लावून ती जपायची आहेत. तरच भविष्यात त्यांचा लाभ आपल्या भावी पिढीला होईल.
--------------
आपली झाडं, देवी झाडं लावा
आपण देशी झाडं लावावीत. त्यांना वाढवावं. हे सर्व आपल्यासाठीच उपयोगी ठरणार आहेत. अशी झाडं लावणाऱ्यांचा सन्मान सह्याद्री देवराईकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी पुढं येऊन आतापासून तयारी करायला हवी.
- सयाजी शिंदे, सह्याद्री देवराई
----------------
राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वांच्या मदतीसाठी सहा विभाग केले आहेत. गावांनी आमच्याशी संपर्क केल्यावर त्यांना सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून दिली जातील.
- सचिन ठाकूर, समन्वयक, पुणे विभाग
---–-------------