साहित्याचा उत्सव दिमाखात करणार
By admin | Published: December 7, 2014 12:46 AM2014-12-07T00:46:36+5:302014-12-07T00:46:36+5:30
संत नामदेव यांच्या भूमीतून साहित्यिक, रसिक घुमान येथे येत आहेत ही आमच्या दृष्टीने खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे.
Next
पुणो : संत नामदेव यांच्या भूमीतून साहित्यिक, रसिक घुमान येथे येत आहेत ही आमच्या दृष्टीने खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठी साहित्य संमेलनाबाबत स्थानिक नागरिकांमध्येही उत्सुकता आहे. गाव लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असले तरी प्रत्येक घरात किमान दहा-दहा लोकांच्या राहण्याची सुविधा होऊ शकते. साहित्याचा हा उत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करू, असा विश्वास घुमान गावचे सरपंच हरबन्ससिंग यांनी व्यक्त केला.
यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका असलेल्या संत नामदेव समितीचे मुख्य समन्वयक, सरपंच हरबन्ससिंग यांचा साहित्य महामंडळातर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हरबन्ससिंग यांचा सत्कार महामंडळातर्फे करण्यात आला. या वेळी महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन तसेच ज्येष्ठ कवी रामदास फुटाणो, संमेलनाचे संयोजक भारत देसडला, संजय नहार, सुखदेव सिंग, सतनाम सिंग, सतसिंग मोखा, पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाच्या माजी पदाधिकारी डॉ. वीणा मनचंदा उपस्थित होते. घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावे, यासाठी 1क्-15 वर्षापासून प्रय} सुरू आहेत. तसे जर झाले तर ती संमेलनाची फलश्रुती ठरेल. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी संमेलच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून येण्याचे मान्य केले आहे. तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुरुदयालसिंग, प्रा. रहेमान राही, केदारनाथ सिंग संमेलनास उपस्थित राहणार आहेत. राज्यातून पाच ते सात हजार रसिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, असे देसडला म्हणाले. (प्रतिनिधी)
4संत नामदेव यांच्याविषयी आमच्या मनात फार आदराची भावना आहे. मराठी संमेलन घुमान येथे होत असल्याने आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे संमेलनाच्या तयारीला दोन महिन्यांपासून सुरुवात केली आहे. घुमानचे वैशिष्टय़ म्हणजे सर्वधर्मसमभाव जपणारी ही भूमी आहे. येथे एकाच छताखाली शिव भगवान, संत नामदेव आणि गुरुग्रंथसाहिबा आहे. संमेलनाला येणा:या प्रत्येकाचे योग्य त:हेने आदरातिथ्य राखू, त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. संमेलनाची रूपरेषा अद्याप निश्चित झालेली नसली, तरी पंजाबच्या संस्कृतीचे दर्शन यात निश्चित घडेल, असे हरबन्ससिंग म्हणाले.