उजनीचे दरवाजे बंद करू
By admin | Published: January 20, 2016 01:23 AM2016-01-20T01:23:51+5:302016-01-20T01:23:51+5:30
उजनी धरणात पाणी सोडण्यास शिरूर, खेडच्या शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर आता उजनीतून खाली पाणी सोडण्यास इंदापूरचे शेतकरी
इंदापूर : उजनी धरणात पाणी सोडण्यास शिरूर, खेडच्या शेतकऱ्यांचा विरोध मावळल्यानंतर आता उजनीतून खाली पाणी सोडण्यास इंदापूरचे शेतकरी
विरोध करीत आहेत. जर भीमा नदीपात्रात पाणी सोडले तर उजनीचे दरवाजे बंद करू, असा इशारा दिला आहे.
भीमा नदीच्या पात्रात सोडण्यास मनाई करावी. पाणी सोडल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दशरथ माने यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
उजनी धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्याला देण्याकरिता पुन्हा हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. सध्या जलाशयात मृतसाठा शिल्लक आहे. शंभर ते दीडशे गावांच्या पाणीपुरवठा योजना यावर अवलंबून आहेत. पुढील सात महिने पाणी पिण्याकरिता वापरावे लागणार आहे. ७ नोव्हेंबर २०१५ ला पुण्याचे विभागीय आयुक्तांनी उजनी धरणातील पाणी सोलापूरला पिण्याकरिता ४ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. त्या वेळी इंदापूर तालुक्यातील जनतेने सर्वपक्षीय मोर्चा काढून १८ नोव्हेंबर रोजी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. पुन्हा पाणी सोडले तर हजारो धरणग्रस्तांचा मोर्चा उजनी धरणावर नेऊन उजनीचे दरवाजे बंद केले जातील, असा इशारा माने यांनी दिला आहे. (वार्ताहर)