राजकारण न करता कोरोनाविरुद्धची लढाई एकत्रित लढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:42+5:302021-05-11T04:10:42+5:30
बेलवाडी (ता. इंदापूर) येथे श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय येथे ५० बेडचा संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात ...
बेलवाडी (ता. इंदापूर) येथे श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय येथे ५० बेडचा संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नेचर उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतिलाल जामदार, सर्जेराव जामदार, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, ॲड. रणजीत निंबाळकर, सचिन सपकाळ, विक्रम निंबाळकर, बेलवाडीचे सरपंच माणिक जामदार, नानासो पवार, चंद्रकांत जामदार, हनुमंत खैरे, दत्तात्रय घाडगे, प्रकाश खैरे, वालचंदनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, बाळासाहेब गायकवाड, डॉ. पूनम गुडले, ओंकार जामदार, दादा यादव, मयूर जामदार, आदी उपस्थित होते.
ॲड. शुभम निंबाळकर म्हणाले की, या कक्षाचे उद्घाटन झाले. त्यानंतर ज्यांना सौम्य लक्षणे होती तसेच ज्यांची घरीच विलगीकरणाची सोय होऊ शकते अशा रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घरी जाण्यास सांगितले. मात्र, विरोधकांनी याचे राजकारण करू नये. आता ही वेळ नाही. राजकीय फायद्यासाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला नसून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे. असे ते म्हणाले.
१० लासुर्णे
बेलवाडी येथे विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना दत्तात्रय भरणे, शुभम निंबाळकर व आदी.