मनातला संकोच घालवू या, चला इंग्रजी बोलू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:34+5:302021-04-28T04:11:34+5:30

पुणे : आधुनिक युगात इंग्रजी भाषा अवगत असणे ही काळाची गरज आहे, असे म्हटले जाते. मात्र इंग्रजी भाषा ...

Let's get rid of hesitation, let's speak English | मनातला संकोच घालवू या, चला इंग्रजी बोलू या

मनातला संकोच घालवू या, चला इंग्रजी बोलू या

Next

पुणे : आधुनिक युगात इंग्रजी भाषा अवगत असणे ही काळाची गरज आहे, असे म्हटले जाते. मात्र इंग्रजी भाषा म्हटले तरी काही जणांच्या अंगावर काटा येतो. मनातली भीती आणि न्यूनगंडामुळे इंग्रजी बोलण्यास धजावत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नसून सर्व वयोगटांतील प्रत्येक व्यक्तीला इंग्रजी सोप्या पद्धतीने शिकता, बोलता येणार आहे. ते फक्त लोकमत इव्हेंट फुल पेजवर होणाऱ्या इंग्रजी भाषेवरील कार्यशाळेतून.

इंग्रज़ीचे नामवंत प्रा. महेशसिंह परदेशी पंधरा दिवसीय कार्यशाळेतून मनातली भीती तसेच संकोच घालवून आता प्रत्येकाला इंग्रजीतून बोलते करणार आहेत. या कार्यशाळेतून व्याकरणाच्या धड्यातून इंग्रजीचा पाय पक्का होणार आहे. ओळखी, अनोळखी शब्दांचा संवाद घडणार आहे. यामुळे लहान मोठ्या होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे कानमंत्र देखील मिळणार आहेत. जागतिक भाषा हसतखेळत आता आपल्याला बोलता येणार आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा शिकण्यासाठी अवश्य ऑनलाईन या फक्त लोकमत इव्हेंट फुल पेजवर रोज संध्याकाळी ४ वाजता. ही कार्यशाळा शनिवार रविवार वगळता पंधरा दिवसीय असून, बुधवार (दि. २८ ) पासून सुरु होणार आहे.

Web Title: Let's get rid of hesitation, let's speak English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.