भावी पिढीसाठी स्वच्छ प्रवाही नद्या करूयाअनिल गायकवाड : राम नदी महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:12+5:302021-01-13T04:24:12+5:30
राम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या राम नदी महोत्सवात रविवारी ते ऑनलाइन मार्गदशर्न करीत होते. महोत्सवाचा आज शेवटचा दिवस ...
राम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या राम नदी महोत्सवात रविवारी ते ऑनलाइन मार्गदशर्न करीत होते. महोत्सवाचा आज शेवटचा दिवस होता. या वेळी स्थानिक नागरिक सुलोचना धनकुडे, भगवान कळमकर, मधुकर दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गायकवाड म्हणाले,‘‘पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शुन्य बजेट शेती शिकवली आहे. त्यांच्यानूसार सेंद्रीय शेती करण्यासाठी पैशांची गरज लागत नाही. सर्व सेंद्रीय वापरले तर कर्ज घेण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे आत्महत्या होणार नाहीत. सेंद्रीय शेतीमुळे चांगले अन्न तयार होईल आणि परिणामी आरोग्य देखील चांगले राहील. ’’
झरे जिवंत करायला पाहिजेत
दळवी म्हणाले,‘‘नदी काठी असलेलं गाव हे आनंदी आणि भाग्याचे असते. पण राम नदी काठी आता अवघड स्थिती आहे. पुर्वी नदी काठी अनेक तलाव होते. त्यात आम्ही पोहायचो. पण आता ते सर्व नाहीसे झाले आहे. राम नदीला अनेक झरे होते. ते देखील बुजवले. ते पुन्हा जिवंत करायला हवेत. नदी काठी आम्ही काही वर्षांपासून काम करतोय. सुमारे हजार वृक्ष लावले आहेत. दर शनिवारी तीस मुले येथे पाणी घालायला येतात. त्यामुळे लवकरच राम नदीचे रूप बदलेल.’’
लोकांनी सहभागी व्हावे
महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, नदीविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी, यासाठी हा महोत्सव आयोजित केला. आमच्याकडे ४० कलमी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम तयार आहे. लोकांनी त्यात सहभागी व्हायला हवे. तरच या महोत्सवाचे खरे यश म्हणता येईल.’’