कॉफी पेंटिंगच्या दुनियेत आपल्या कल्पना रंगवू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:04+5:302021-05-08T04:12:04+5:30

पुणे : ‘कॉफी’ म्हटलं की वाफाळता कप, बेफाम करणारा सुगंध, मित्रांचा कट्टा किंवा रोमँटिक डेट अशा अनेक गोष्टी ...

Let's paint our ideas in the world of coffee painting | कॉफी पेंटिंगच्या दुनियेत आपल्या कल्पना रंगवू या

कॉफी पेंटिंगच्या दुनियेत आपल्या कल्पना रंगवू या

Next

पुणे : ‘कॉफी’ म्हटलं की वाफाळता कप, बेफाम करणारा सुगंध, मित्रांचा कट्टा किंवा रोमँटिक डेट अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. ‘कॉफी’शी प्रत्येकाचीच एखादी खास आठवण जोडली गेली आहे. पण, याच आपल्या आवडत्या ‘कॉफी" मधून एखादी आगळीवेगळी कला देखील शिकता येऊ शकते. हीच संधी ‘लोकमत’ने कॉफी प्रेमींसह कलाप्रेमी मंडळींना उपलब्ध करून दिली आहे. प्रसिद्ध चित्रकार प्रज्ञा कुलकर्णी या कलेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. येत्या रविवारी दि. ९ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर या कलेचे धडे गिरवायला मिळणार आहेत.

सध्या कोरोनाच्या संचारबंदी काळात घराबाहेर पडण्यावर काहीसे निर्बंध आले आहेत. अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. शाळा, कॉलेजला देखील सुट्ट्या आहेत. मग फावल्या वेळेत करायचे काय? असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी नवीन कला शिकण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या कलेमध्ये कागदावर कॉफीचा पहिला प्रयोग केला जाणार आहे. एकाच नैसर्गिक रंगात रंगणार विविध छटा अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी ए ४ आकाराचे ड्रॉईंग पेपर/ चित्रपत्र पेपर, ४ ब्रू कॉफी सॅचेट गोल पेंट ब्रश क्रमांक (१ आणि ६), फ्लॅट ब्रश क्रमांक ८, पॅलेट, पाण्याने भरलेला मग, खराब कापड अशा साहित्याची गरज भासणार आहे. चला तर मग वेळ मुळीच दवडू नका! सुट्टीचा वापर करा आणि हा नवीन छंद जोपासा.

--------------------------------

Web Title: Let's paint our ideas in the world of coffee painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.