वालचंदनगरच्या एसटी बसच्या समस्या सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:12 AM2021-02-16T04:12:32+5:302021-02-16T04:12:32+5:30
वालचंदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी नुकतीच वालचंदनगर बसस्थानकास भेट दिली. त्यावेळीत्यांची ...
वालचंदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी नुकतीच वालचंदनगर बसस्थानकास भेट दिली. त्यावेळीत्यांची सामाजिक कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांच्याशी झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाकडून अपेक्षा व प्रवाशांच्या अडचणी समस्या या विषयावर बोलणी झाली.
इंदापूर तालुक्यातील शाळा सध्या सुरू झाल्या असल्यामुळे वालचंदनगर येथील शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी म्हणून एसटीबसची व्यवस्था केली जावी, बसगाड्यांचे परिवहन व्यवस्थित व्हावे. प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून वालचंदनगर बसस्थानकावर एका वाहतूक नियंत्रकाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. बारामतीहून उद्धट, तावशी, कळंब मार्गे वालचंदनगरला येणाऱ्या तसेच नातेपुते येथून वालचंदनगरला येणाऱ्या व अकलूज येथून वालचंदनगरला येणाऱ्या सर्व बसगाड्या नवीन बसस्थानकापर्यंत जाव्यात अशा मागण्या तेरखेडकर यांनी त्यांच्याकडे केल्या.. आणि विशेष म्हणजे विभाग नियंत्रकांनी सदरच्या
मागण्या तत्काळ मान्य केल्या. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळेस बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. वालचंदनगरच्या जुन्या बसस्थानकावर स्वतंत्र नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली असून अकलूज नातेपुते व बारामतीहून उद्धट, तावशी, कळंबमार्गे वालचंदनगरला येणाऱ्या सर्व बसगाड्या आता नवीन स्थानकावर जाण्यास सुरुवात झाली आहे.
--
फोटो क्रमांक : १५ इंदापूर बसस्थानक भेट
फोटो ओळी: