'चला मोटारसायकल बाजुला घ्या', पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला १ लाखांना लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:48 PM2022-03-30T19:48:50+5:302022-03-30T19:49:03+5:30
ज्येष्ठ नागरिकाची सुमारे १ लाख वीस हजाराची फसणूक केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
राजगुरुनगर : पोलिस असल्याची बतावणी करुन जेष्ठ नागरिकाची सुमारे १ लाख वीस हजाराची फसणूक केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध खेडपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाळू नारायण मांजरे ( वय ६५ रा .मांजरेवाडी पिंपळ ता खेड ) असे फसवणूक झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू मांजरे, व त्यांचा मित्र रखमा मांजरे मांजरेवाडी येथून दुचाकीवर खेडकडे जात होते. दरम्यान होलेवाडी गावालगत अचानक एक इसम पाठीमागे दुचाकीवर आला. पोलीस असल्याची बतावणी करुन काय राव तोंडाला मास्क न लावता बिनधास्त फिरताय मी थांबा म्हटलो तरी तुम्ही थांबले नाही. आमचे साहेब पाठीमागे बसले आहे. चला मोटारसायकल बाजुला घ्या, असे म्हणून फिर्यादीची झडती घेऊन गळयातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन किंमत ८८ हजार रुपये, बोटातील अर्धा तोळयाची अंगठी किंमत २६ हजार रुपये, तसेच ६ हजार रुपये रोख रक्कम काढून घेऊन चोरट्याने पोबारा केला. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.