जुन्नरमधील भिंती लागल्या बोलू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:51+5:302021-01-10T04:08:51+5:30
जुन्नर: केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियानासाठी जुन्नर शहर व नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे़ दरम्यान, नागरिकांमध्ये ...
जुन्नर: केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियानासाठी जुन्नर शहर व नगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे़ दरम्यान, नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून शहरातील भिंतींवर प्रबोधनपर चित्रे तसेच ऐतिहासिक पर्यटनस्थळांची चित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील भिंती बोलू लागल्याचा आभास होत आहे़
२०२० प्रमाणेच यावर्षी सुद्धा जुन्नर नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानात कंबर कसली असून, शहरात विविध कामांच्या माध्यमातून पालिका अव्वलस्थान मिळवण्यास प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले़ शहरातील विविध भिंतींवर शिवनेरी किल्ल्याचे दरवाजे, खोडद येथील दुर्बीण, लेण्या, नाणेघाट, विविध किल्ले, ऐतिहासिक इमारती आदी कलाकृती चित्ररूपाने साकारल्या आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानामध्ये शहरात नगरपालिका पदाधिकारी, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गृहिणींसाठी घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून नागरिकांनी हरित शपथ घेण्याचे आवाहन पालिकेने केले होते़ यासंदर्भात वेब पोर्टलवर नावनोंदणी करून डिजिटल स्वरुपात शपथ घेतल्याबद्दल प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे़ ़
०९ जुन्नर १
०९ जुन्नर २