कडूस धरणाच्या समस्या निवारणासाठी त्वरित प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:45+5:302021-07-31T04:11:45+5:30
-- कडूस : कडूस येथील श्री भैरवनाथ पाणीवाटप संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहे. संस्थेच्या पूर्वनियोजनामुळे ...
--
कडूस : कडूस येथील श्री भैरवनाथ पाणीवाटप संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करीत आहे. संस्थेच्या पूर्वनियोजनामुळे शेतकऱ्यांना आणि गावाला पाण्याची टंचाई भासत नाही. संस्थेचे काम अधिक सुरळीत होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणलेल्या समस्या त्वरित सोडविल्या जातील, असे आश्वासन खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.
कुमंडला नदीवरील लघुपाटबंधारा तलाव या वर्षी लवकर पूर्ण भरला आहे. त्याचे व बंधाऱ्याचे जलपूजन आमदार आमदार व पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी अशोक शेंडे, उपसरपंच कैलास मुसळे, भैरवनाथ पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढमाले, सोसायटी चेअरमन पंडित मोढवे, माऊली ढमाले, दत्ता ढमाले, तात्यासाहेब धायबर, मारुती जाधव, विशाल ढमाले, अभिजित शेंडे, हनीफ मोमीन, बबलू शेख, रामदास मंडलिक, चंद्रकांत पानमंद संस्थेचे संचालक श्रीपती अरगडे, सुरेश जाधव, पंडित पोटे, बाळासाहेब बोंबले, बाळासाहेब चिपाडे, दादाभाऊ ढमाले, नानाभाऊ नाईकोडे, ग्रामपंचायत सदस्य अरूण शिंदे, उपाध्यक्षा पुष्पाताई गारगोटे, कमलताई नेहेरे, संस्थेचे सचिव किसन गारगोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.
छोटे पाटबंधारे, धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने कडूस व परिसरातील बळीराजा सुखावला आहे. यामुळे पाचशे हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. जिरायती व बागायती पिकांसाठी गरजेनुसार धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. बंधारा क्षमता २.२५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गतवर्षी संस्थेने नियोजन केल्यामुळे पाणीटंचाई भासली नव्हती.
--
चौकट
पाटबंधारे विभागाच्या शासकीय आदेशानुसार मार्चअखेर १००% पाणीपट्टी वसुली भरल्यास ५०% परतावा संस्थेला मिळत असतो. सन २००५ पासून संस्थेकडून जी. आर. नुसार परतावा रकमेची लेखी स्वरुपात मागणी करत आहे. पाटकऱ्याच्या निवासाची चौकी नादुरुस्त झाली आहे. धरण भिंतीवर व लगतच्या भागात लहान मोठ्या झुडपांची वाढ बंधाऱ्याला धोकादायक ठरू शकते. यासाठी निधीची गरज आहे. पाटबंधारे विभागाकडे मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे अध्यक्ष दिलीप ढमाले यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्या.
--
फोटो क्रमांक : ३० कडूस बंधारा
सोबत फोटो-- कडूस येथील लघुपाटबंधारे विभागाच्या पूर्णपणे भरलेल्या, छोटा बंधाऱ्याच्या पाण्याचे पूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.