भीमा-पाटस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:24+5:302021-09-18T04:12:24+5:30
देऊळगावराजे : दौंड तालुक्यातील तोट्यातील संस्थांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याची गरज असून, नुसतीच टीका करून जमणार नाही. ...
देऊळगावराजे : दौंड तालुक्यातील तोट्यातील संस्थांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याची गरज असून, नुसतीच टीका करून जमणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन चालावे लागते. सहकार चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी चांगलं काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे भीमा पाटस सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
देऊळगाव राजे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित जिल्हा परिषद गटनिहाय बैठक व दौंड तालुका लिंगाळी-मलठन जिल्हा परिषद गट मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आप्पासाहेब पवार, देऊळगावराजेचे सरपंच स्वाती गिरमकर, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रमेश थोरात म्हणाले की, भीमा पाटस स्थापन होऊन जवळपास ४२ वर्षे झाली. त्यात आकरा वर्ष स्व. मधू शितोळे चेअरमन होते. त्यानंतर दहा वर्षे स्व. सुभाष आण्णा व मी कारखान्याचा कारभार हाकला. त्या दरम्यान एकही महिना कामगारांचा पगार व उस उत्पादकांची देणी थकली नाहीत. परंतु भीमा पाटसचे विद्यमान अध्यक्ष २० ते २१ वर्षे कारभार हाकत असताना कारखान्याची यंत्र सामग्रीसुद्धा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या आवस्थेत राहिली नाही, अशी टीका नाव न घेता रमेश थोरात यांनी केली.