चला, गाव पाणीदार करू या !

By Admin | Published: April 10, 2017 02:06 AM2017-04-10T02:06:26+5:302017-04-10T02:06:26+5:30

सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून

Let's wash the village! | चला, गाव पाणीदार करू या !

चला, गाव पाणीदार करू या !

googlenewsNext

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली असून, पुरंदर तालुक्यात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. साकुर्डे (ता. पुरंदर) येथे सुमारे दोनशे ग्रामस्थांनी श्रमदानाचा शुभारंभ करीत गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला आहे.
या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. दुष्काळमुक्त गाव करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, यात लोकसहभागाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या गावाला ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या गावांसाठी अनुक्रमे ३० लाख व २० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात प्रथम येणाऱ्या गावासाठी १० लाखांचे बक्षीस असून, या स्पर्धेत पुरंदर तालुक्यातील एकूण ३३ गावांनी सहभाग घेतला आहे. शनिवारपासून २० गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितली. पाणी फाउंंडेशनचे पुरंदरचे समन्वयक सुरेश सस्ते यांच्या उपस्थितीत श्रमदानाला सुरुवात केली. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, खरेदी-विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, सरपंच तृप्ती जगताप, माजी सरपंच माईसाहेब सस्ते, सदस्या सविता जगताप, सदस्य सचिन थोपटे, माजी उपसरपंच राजेंद्र सस्ते, सदाशिव सस्ते, सुरेशनना सस्ते, वामन सस्ते, राजेंद्र जाधव, पोपट जगताप, किसन देशमुख एकनाथ सस्ते आदी उपस्थित होते. गावातील मतभेद, हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एक दिलाने गाव पाणीदार बनवू, अशी प्रतिज्ञा यावेळी ग्रामस्थांनी घेतली.

संपूर्ण तालुक्यात साधारणपणे २००० जणांनी श्रमदानास सुरुवात केली आहे. आज ३००० ग्रामस्थांचा सहभाग दिसला. येत्या आठवडाभरात संपूर्ण तालुक्यात २५ हजारांवर लोकांचा गावा-गावांतून
सहभाग दिसेल.  दररोज श्रमदानाला प्रतिसाद वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. यात साकुर्डे येथील ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला.  पहिल्या दिवशी दोनशे ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर आज सुमारे सुमारे चारशे ग्रामस्थांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठा होता.

Web Title: Let's wash the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.