पालिकेचे नगरविकास विभागाला पत्र

By Admin | Published: April 17, 2017 06:28 AM2017-04-17T06:28:41+5:302017-04-17T06:28:41+5:30

महामार्गांची मालकी नेमकी कोणाची आहे यावर कोणतेही मत व्यक्त न करता महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या

Letter to Municipal Urban Development Department | पालिकेचे नगरविकास विभागाला पत्र

पालिकेचे नगरविकास विभागाला पत्र

googlenewsNext

पुणे : महामार्गांची मालकी नेमकी कोणाची आहे यावर कोणतेही मत व्यक्त न करता महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे. मनपाच्या हद्दीमधून जाणाऱ्या तीन राज्यमार्ग आणि दोन राष्ट्रीय महामार्गांची देखभाल दुरुस्ती पालिका करीत असल्याचे या
पत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आलेले पत्र जसेच्या तसे पुढे पाठविण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. एक एप्रिलनंतर देशभरामध्ये ही बंदी लागू झाली आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर १ हजार ६00 आस्थापनांपैकी त्यातील साडेचारशे दुकाने शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीच नूतनीकरण थांबवले होते. गेल्या वर्षभरात महसुलामध्ये तब्बल ३00 कोटींची घट झाली आहे. आणखीही महसूल खाली येण्याची शक्यता आहे. महापालिकेला मिळणारा महसूलही घटणार आहे.

Web Title: Letter to Municipal Urban Development Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.