पातळी खालावली

By admin | Published: July 9, 2015 02:05 AM2015-07-09T02:05:44+5:302015-07-09T02:05:44+5:30

भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Level lowered | पातळी खालावली

पातळी खालावली

Next

देऊळगावराजे : येथील भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
ऐन पावसाळ्याच्या कालावधीत जून व जुलै या महिन्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेली आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत पपांना पाणी पुरत नसल्याने खर्च करून पाईप व केबल वायर वाढविण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात भीमा नदीची पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे सध्याचा ऊसलागवडीचा हंगाम असतानाही शेतकरी ऊसलागवड करण्यास तयार नाही. कारण, लागवड करीत असताना शेतीचा मशागत खर्च, बेणे खर्च, मजूर खर्च हा अवाचा सवा होत आहे. दुसरीकडे, पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे ऊसलागवड करावी तरीही अडचण व न करावी तरीही अडचण, अशा दुहेरी चिंतेत शेतकरीवर्ग अडकला आहे.
कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे एफआरपीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही; त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज भरण्याची ३० जूनची तारीख उलटून गेली. मात्र, पीककर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळत नाहीत. पाणीप्रश्न, विजेचा प्रश्न या सर्व बाबींमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, कर्जमाफीची मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे. (वार्ताहर)

पावसाने दडी मारल्याने बोअरवेलचा आधार
> राजेगाव : पावसाने ओढ दिल्याने राजेगाव (ता. दौंड) परिसरात बोअरवेल (कूपनलिका) घेण्याचे काम सुरू झाले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी, ज्योतिबानगर, मलठण, वाटलूज, नायगाव आणि राजेगावच्या काही भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
४समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बाजरी, मका, कडवळ ही खरिपातील पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला. योग्य वापसा आल्यानंतर त्याने पेरणीही करून घेतली. परंतु, आज परंतु आज महिना होत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणी करावी लागते कि काय या विवंचनेत बळीराजा पडला आहे.

> आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर अंकुरलेली पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याने पावसाचा धावा करण्यास सुरुवात केली आहे. मेघराजाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवली, तर खरीप हंगाम धोक्यात येऊन चारा आणि पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे.
४दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्र्डी ही गावे उजनी धरणा तील पाणलोट क्षेत्रातील भागात येत असल्याने या भागातील शेतकरी ऊस हे पीक प्रामुख्याने घेत असतो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडही भरपूर केल्या आहेत. या भागात कमी पाऊस झाला, तरी खडकवासला धरण साखळी परिसरात भरपूर पाऊस पडून एकदा उजनी धरण भरले की या भागातील शेतकरी निवांत होतो.

Web Title: Level lowered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.