लायसन्सची मुदत संपली, अपॉइंटमेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:30+5:302021-06-10T04:08:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात ज्या वाहनधारकांच्या वाहन परवान्याची मुदत संपली त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात ज्या वाहनधारकांच्या वाहन परवान्याची मुदत संपली त्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात शिकाऊ व कायम स्वरूपाच्या परवान्यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली अथवा संपत आली आहे, त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन आपला वाहन परवाना नूतनीकरण करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना वेटिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून आरटीओ कार्यालय सुरू झाले. मात्र, शासनाच्या निर्देशनुसार ५० टक्के कर्मचारी उपस्थिती असल्याने सर्व प्रकारच्या कामकाजावर काही अंशी निर्बंध आले आहे. यात वाहन परवान्यांचा कोटा हा अर्ध्यावर म्हणजेच ५० टक्के करण्यात आला आहे. मागील दोन ते तीन दिवसांत फार कमी प्रतिसाद वाहन परवान्यांसाठी मिळाला आहे. रोज कोट्यातील स्लॉट शिल्लक राहत आहे. मात्र, ही परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वाहनधारकांनी वाहन परवान्यासाठी अपॉइंटमेंट तत्काळ घ्यावी.
बॉक्स 1
अशी घ्या अपॉइंटमेंट :
वाहनधारकांनी परिवहन, सारथी या परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे. परवाना सेवा संदर्भात विंडोवर क्लिक करणे. त्यात नूतनीकरण हा पर्याय निवडणे. त्यानंतर अर्ज करणे. अर्ज केल्यानंतर ओटीपी आपल्या मोबाईलवर येईल. तो सादर केल्यानंतर फी भरणे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून आरटीओ कार्यालयात जमा करणे.
बॉक्स २
असा आहे कोटा :
वाहनाचा प्रकार कोटा
शिकाऊ परवाना ३५०
दुचाकी विना गिअर १००
दुचाकी गिअरसह १८०
चारचाकी २००
चारचाकी परिवहन ४०
कॅब ३०
बस ०५
ट्रॅक्ट ०४
क्रेन ०१
बॉक्स ३
तीन दिवसांत १५५० वाहनांची नोंदणी
सोमवारपासून आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी सुरू झाली. यात दुचाकी ११०० व चारचाकी ४५० याचा समावेश आहे.
कोट
वाहन परवाना नूतनीकरणासाठी जून महिन्याची मुदत देण्यात आली. त्यासाठी वाहनधारकांनी अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे