लेफ्टनंट कर्नल अनंत गोखले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:01+5:302021-09-23T04:14:01+5:30
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे मार्च १९६८ मधील गार्डसच्या १३ व्या ...
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, दोन जावई, नातवंडे असा परिवार आहे
मार्च १९६८ मधील गार्डसच्या १३ व्या बटालियन ब्रिगेडचे ते पहिले कमिशण्ड ऑफिसर होते. १९९७ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत भारतीय लष्कराच्या सर्व मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९७१ मधील ऑपरेशन कॅक्टस लिली अर्थात बांगलादेश मुक्तीसंग्राममधील पूर्व पाकिस्तानचा सर्वात महत्त्वाचा कैदी लेफ्टनंट जनरल एसके नियाझी यांच्या नजरकैदेची अत्यंत जोखमीची जबाबदारी गोखले यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. १९८८-८९ च्या श्रीलंकेमधील ऑपरेशन पवनमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.
इनफन्ट्री ऑफसर म्हणून ३० वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेचे पहिले कमांडर म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य व अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली.
फोटो - अनंत गोखले