पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:03 AM2021-09-02T11:03:59+5:302021-09-02T11:04:06+5:30

पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीत पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणं, सासु सासरे तिला भडकावितात त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

Life ended with his wife, mother-in-law and father-in-law getting bored; The second incident of the week in Pune | पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

पत्नी, सासु सासर्‍याच्या त्रासाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पुण्यात आठवड्यातील दुसरी घटना

Next
ठळक मुद्देगोखलेनगरमधील तरुणाने २२ ऑगस्टला पत्नी व सासु, सासरे यांच्या जाचाला कंटाळून केली होती आत्महत्या

पुणे : पत्नीला वेगळे रहायचे असून त्याला सासुसासरे, मेव्हणा हे फुस लावतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना धनकवडीमध्ये घडली आहे. पत्नी, सासु सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.

शरद नरेंद्र भोसले (वय ३०, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शरद भोसले यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात संशयी पत्नी व तिचे आईवडिल, भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हंटल आहे. 

सहकारनगर पोलिसांनी पत्नी प्रियंका शरद भोसले (वय २८), मेव्हणा मनिष ऊर्फ गणेश शंकर शिंदे (वय २७), शंकर शिंदे (वय ५६), रोहिणी शंकर शिंदे (वय ५०, सर्व रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. याप्रकरणी नरेंद्र दत्तात्रय भोसले (वय ५८, रा. दौलतनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

शरद आणि प्रियंका यांचे २०१८ मध्ये लग्न झालं होतं. लग्न झाल्यापासून प्रियंकाला वेगळे राहायचं होतं. त्यासाठी ती शरद याच्याशी भांडणे करीत व माहेरी निघुन जात असे. माहेरी तिचे आईवडिल तिला फुस लावत असतं. प्रियंका शरद याच्या चारित्र्याचा संशय घेऊन त्याच्याशी भांडणं करीत होती. काही दिवसांपूर्वी शरदचा मेव्हणा मनीष याने त्यांच्यातील भांडणे मिटविण्यासाठी शरद व त्यांच्या वडिलांना मार्केटयार्ड परिसरात बोलावून घेतले होते. तेथे त्याने दोघांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती.

पत्नीची सातत्याने करीत असलेल्या तक्रारी व माहेरी निघून जाण्याच्या प्रकारानं शरद यानं कंटाळून २९ ऑगस्ट रोजी बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शरदने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यात पत्नीचे सातत्याने माहेरी निघुन जाणं, सासु सासरे तिला भडकावितात त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे अधिक तपास करीत आहेत.

गोखलेनगरमधील तरुणाने २२ ऑगस्टला पत्नी व सासु, सासरे यांच्या जाचाला कंटाळून केली होती आत्महत्या 

गोखलेनगरमधील निखिल शाम धोत्रे (वय २९) या तरुणाने २२ ऑगस्ट रोजी पत्नी व सासु सासरे यांच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. निखिल याच्या पत्नीने आपल्याला जबरदस्तीने फिनेल पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्यादी चतु:श्रृंगी पोलिसांकडे दिली होती. त्यावरुन पोलिसांनी निखिल, त्याची आई व भावावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निखिलने आत्महत्या केल्यावर पोलिसांनी त्याची पत्नी व सासु सासर्‍यावर गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Life ended with his wife, mother-in-law and father-in-law getting bored; The second incident of the week in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.