Pune Crime: लोखंडी रॉड डोक्यात मारून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 19:40 IST2023-07-01T19:35:21+5:302023-07-01T19:40:01+5:30
रमाबाई यांच्या खून प्रकरणात ही शिक्षा आरोपीला सुनावण्यात आली आहे....

Pune Crime: लोखंडी रॉड डोक्यात मारून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
पुणे : घरगुती भांडणावरून लोखंडी रॉड उजव्या हातावर आणि डोक्यावर मारून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली. ज्ञानेश्वर अण्णा गायकवाड (वय ३२, रा. विश्रांतवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. रमाबाई यांच्या खून प्रकरणात ही शिक्षा आरोपीला सुनावण्यात आली आहे.
आरोपीच्या राहत्या घरात १९ जुलै २०१९ रोजी ही घटना घडली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सोपान नरळे याने फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले. पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून नील यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार एन. पी. पाटील यांनी मदत केली. स्वयंपाक करण्याच्या कारणावरून खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.