प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By admin | Published: May 13, 2017 04:57 AM2017-05-13T04:57:56+5:302017-05-13T04:57:56+5:30
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व पुरावा नष्ट केल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व पुरावा नष्ट केल्याने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही गुन्ह्यांमध्ये प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ही ठोठावला. पी. वाय. लाडेकर यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.
अर्जुन बाबूराव नाटेकर उर्फ नाचेकर (वय २५, रा. कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अर्जुन याचे खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याप्रकरणी सरकारी वकील सुरेश गवळी यांनी ९ साक्षीदार तपासले. यात खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून जे. सी. मुजावर यांनी काम पाहिले.