पूर्व वैमनस्यातून झालेल्या खूनातील सहा आरोपींना जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 08:29 PM2019-01-18T20:29:49+5:302019-01-18T20:31:54+5:30

पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली. 

Life imprisonment for six murder accused | पूर्व वैमनस्यातून झालेल्या खूनातील सहा आरोपींना जन्मठेप 

पूर्व वैमनस्यातून झालेल्या खूनातील सहा आरोपींना जन्मठेप 

Next

पुणे : पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादातून एकाचा खून केल्याप्रकरणी ६ आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली. 

                नागेश साहेबराव गायकवाड (वय २०), महेश उर्फ  जॅकी मच्छिंद्र कांबळे (वय १९), ओंकार सचिन बांदल (वय २३), विकी बबन ओव्हाळ (वय २०), दीपक श्रीरंग शिंदे (वय २९, पाचही रा. बालाजी नगर, भोसरी) आणि राजू भीमराव हाके (वय २१, आदर्शनगर, मोशी) अशी शिक्षा झालेल्या सहा जणांची नावे आहेत. रामा भीमराव गोटे ( वय १९, बाळजीनगर, भोसरी) यांचा १४ फेब्रुवारी २०१५ रोजी भोसरी एमआयडीसी परिसरात खून झाला होता. आरोपींनी केलेल्या हल्यात राजेश मनोहर स्वामी (वय १९, दापोडी), लखनकुमार गायकवाड (वय १९, बालाजीनगर, भोसरी) यांच्या देखील खुनाचा प्रयत्न केला होता. याबाबत जखमी राजेश मनोहर स्वामी यांनी फिर्याद दिली.   

                     घटनेच्या दिवशी जखमी स्वामी, गायकवाड आणि रामा तसेच आरोपी दीपक शिंदे आणि राजू हाके भोसरी एमआयडीसी जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यामुळे सर्व जण बील न देता निघून गेले. त्यावेळी गोटेसह तिघे समझोत्यासाठी बालाजीनगरकडे जात  असताना धारधार हत्यारासह उभ्या असलेल्या आरोपींनी तिघांवर सपासप वार करून गोटेचा खून केला. तर स्वामी आणि गायकवाड यांना गंभीर जखमी केले. याबाबत सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. दरम्यान जखमी लखन गायकवाड याने केस मागे घ्यावी म्हणून त्याच्या आईवर आरोपी राजू हाकेच्या भावाने वार केले होते. त्याबद्दल गुन्ह्याही दाखल झाला होता.

             या खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी पंधरा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजत पोलीस हवालदार दादासाहेब पांडुळे आणि पोलीस हवालदार नारायण पवार यांनी मदत केली. गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी केला. खटल्यात जखमींची, वैद्यकीय पुरावा, रासायनिक विश्लेषकाचा अहवाल महत्वाचा ठरला. न्यायालयाने सहाही जणांना भादवि ३०२ नुसार जन्मठेप व ५ हजार रुपये दंड व इतर कलंमान्वये शिक्षा व दंडा सुनावला. दंडाच्या रकमेपैकी ३० हजार रुपये मृताच्या कुटुंबियांना तर दोन जखमींना ३० हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

Web Title: Life imprisonment for six murder accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.