जीवन मूल्यवान; पण त्याला सुरक्षेची जोड द्यावी : टोणपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:07+5:302021-02-06T04:17:07+5:30
डुडुळगाव (आळंदी) येथे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व दिघी- आळंदी वाहतूक विभाग यांच्या संयुक्त ...
डुडुळगाव (आळंदी) येथे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व दिघी- आळंदी वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा मोहीम’ कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, संस्थेचे खजिनदार मयूर ढमाले आदिंसह महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, स्वयंसेवक उपस्थित होते.
दरम्यान रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत विद्यार्थी व समाजामध्ये अधिक जनजागरण व्हावे म्हणून वाहतूक सुरक्षा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर पोस्टर, व घोषवाक्य तयार करून जनजागृती करण्यात आली. ऑनलाइन वाहतूक सुरक्षेची शपथ सर्व स्वयंसेवकांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक डॉ. विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन शीतल काकडे तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. कृष्णा मिटकर यांनी मानले.
०४ आळंदी
डुडुळगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे.