जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:00+5:302021-09-18T04:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ...

Life saving for paddy farming in the district | जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

जिल्ह्यातील भात शेतीला जीवदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डिंभे : भातशेतीचे आगार समजल्या जाणाऱ्या उत्तर पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ हजार ९६१ हेक्टर भात क्षेत्रापैकी ५४ हजार १०१ हेक्टर क्षेत्र यंदा लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी या भागातील भात उत्पादक शेतकरी धास्तावले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भातशेतीला जीवदान मिळाले असून. शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून दरवर्षी हजारो हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील भातक्षेत्र हे प्रामख्याने जिरायती क्षेत्र केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडू लागली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळाशी, भोर, वेल्हा हे तालुके भातशेतीचे आगर समजले जातात. या भागात आंबेमोहोर, इंद्रायणी, जिर, तांबडा रायभोग, बासमती या पारंपरिक वाणाबरोबरच विविध संकरित वणानांचीही लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्रापैकी ९३ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

चौकट

तालुका एकूण क्षेत्र (हेक्टर) लागवड झालेले क्षेत्र (हेक्टर) टक्के

जुन्नर १०,८०० १०,८०० १००.००

आंबेगाव. ५१३७ ४८२१ ९३.८४

खेड ७७५० ६६१० ८५.२९

हवेली २९५४ २९५४ १००

मुळशी ७७०० ६४५५ ८३.८३

भोर ७१४३ ७४८० १०४.७१

मावळ ११,५५० १०,१२१ ८७.६३

वेल्हे ४९३४ ४७१७ ९५.००

पुरंदर १०१२ ११४१ ११२.७५

चौकट

मागील महिन्यापासून पावसाने घेतलेली मोठी विश्रांती भात उत्पादक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवू लागली होती. जुलै महिन्यातील अतिवृष्टीतून उरल्यासुरल्या हळव्या व गरव्या जातीच्या भातवाढीसाठी पावसाची नितांत गरज असतानाच पावसाने काढता पाय घेतल्याने खाचरातील पाणी आटून पिके पिवळी पडू लागली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असून, या पावसाने भातपिकाला जीवदान दिले आहे. यामुळे भात उत्पादक शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

कोट

यंदा अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. उरलीसुरली शेतीही पाण्याअभावी वाया जाण्याची भीती वाटत होती. पण पावसाने जिवात जीव आला आहे. कशीबशी हातातोंडाशी गाठ पडण्याची अपेक्षा आहे - चंद्रकांत भवारी, भात उत्पादक शेतकरी

फोटो : अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भातपिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कामाला लागला आहे. (छायाचित्र : कांताराम भवारी)

Web Title: Life saving for paddy farming in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.