येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:12 IST2024-12-13T13:11:27+5:302024-12-13T13:12:37+5:30

खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था असून चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते

Life sentenced prisoner escapes from Yerwada open jail | येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार

पुणे : येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाला. याप्रकरणी कैद्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल मेघदास पटोनिया (वय ३५) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावातील आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा, तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती.

बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा पटोनिया आढळून आला नाही. त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पसार झालेल्या पटोनियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक टकले तपास करत आहेत.

Web Title: Life sentenced prisoner escapes from Yerwada open jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.