आजीला घरी नेण्यासाठी मुलांचा व दिरांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:28+5:302021-03-17T04:10:28+5:30

ही कहाणी आहे बारकाबाई लक्ष्मण सांगले यांची. त्याचे घडले असे वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर हे गाव दऱ्या खोऱ्यांच्या ...

The life-threatening journey of children and grandchildren to take Grandma home | आजीला घरी नेण्यासाठी मुलांचा व दिरांचा जीवघेणा प्रवास

आजीला घरी नेण्यासाठी मुलांचा व दिरांचा जीवघेणा प्रवास

Next

ही कहाणी आहे बारकाबाई लक्ष्मण सांगले यांची. त्याचे घडले असे वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर हे गाव दऱ्या खोऱ्यांच्या मध्यभागी व दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. स्वातंत्र्यानंतर अद्यापही या गावात कोणताही रस्ता झालेला

नाही. त्यामुळे गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. गावातून एसटीसाठी जायचं झाल्यास डोंगर चढून तीन तासांच्या प्रवासानंतर एसटीच्या थांब्यावर पोहचता येते. बारकाबाई सांगळे या आजारी पडल्या. पुणे शहराकडे येण्यासाठी तीन तास चालणे त्यांना शक्य नव्हते त्यामुळे त्यांचा मुलगा बाळासाहेब लक्ष्मण सांगळे

व दीर मारुती सांगळे यांनी तिला महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर आजीला घरी सोडले

त्यावेळी मुलगा व दीर यांनी रायगड किल्ल्याच्या डोंगर रांगामधून तिला उन्हातान्हात पायपीट करीत कधी थांबत तर कधी

थोडीसी विश्रांती घेत डोलीमधून आपल्या मुळ गावी चांदर येथे आणले.

सह्याद्रीच्या डोंगर रांगा या परिसरात असून किल्ले रायगड, किल्ले लिंगाणा असे अवघड गड देखील

याच भागात आहेत. उंच उंच भिंतीसारखे या ठिकाणी मोठमोठे कडे आहेत. केवळ वाऱ्याची झुळुकच या कडीकपारीतून जाऊ शकते

प्राणी व मानव या अवघड वाटेतून जाऊ शकत नाही. जाताना वाटेत खूप मोठे जंगल येते. या जंगलात रानटी जनावर देखील आहेत. बिबट्याचे दर्शन या परिसरात ग्रामस्थांना नेहमीच घडत असते तरीदेखील आजीच्या इच्छेसाठी मुलाने व दीरांने या अवघड वाटेतून तब्बल तीस किलोमीटर डोलीमधून आजीला गावी सुखरुप आणले.

--

कोट-१

माझ्या आईची एकच इच्छा होती माझ्या गावातच माझ म्हातारपण जावं. त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला महाड येथुन डोंगर दऱ्यामधून डोलीमधुन माझ्या मुळ गावी चांदर येथे आणले.

- बाळासाहेब सांगळे मुलगा

--

कोट-२

गावामध्ये दळणवळणाचे कोणतेही साधन नाही तसेच आरोग्यसेवेसाठी पुण्यापेक्षा महाडला जाणे सोयिस्कर आहे.डोंगर दऱ्यातील पायवाटेने महाडला जाता येते.

त्यामुळे दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी किंवा गावात वैद्यकीय सोय उपलब्ध करणे गजरेचे आहे.- मारुती सांगळे दीर

--

फोटो : १६मार्गसनी

फोटोसाठी ओळ - चांदर (ता.वेल्हे) सह्याद्रीच्या उंच अशा डोंगर द-यातुन आजीला घरी घेऊन जात असताना मुलगा बाळासाहेब सांगळे व दीर

मारुती सांगळे

Web Title: The life-threatening journey of children and grandchildren to take Grandma home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.