सुधार गृहातून बाहेर पडलेल्या युवकांच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:15 AM2021-03-04T04:15:22+5:302021-03-04T04:15:22+5:30

महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेश यशोद, व महाराष्ट्र राज्य बाल सरंक्षण योजना यांच्या सहकार्याने महिला ...

The life of the youth who have left the reformatory will get a new direction | सुधार गृहातून बाहेर पडलेल्या युवकांच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा

सुधार गृहातून बाहेर पडलेल्या युवकांच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा

Next

महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेश यशोद, व महाराष्ट्र राज्य बाल सरंक्षण योजना यांच्या सहकार्याने महिला व बाल विकास विभागाने महाराष्ट्र राज्य परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेमध्ये राज्यस्तरीय मदत केंद्राचे कार्य सुरू करण्यात आले आहे. या संघटनेने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 8530094848/ 8530024343 या क्रमांकावर संपर्क साधला असता, बालगृहबसू निरीक्षण गृहामधून बाहेर पडल्यानंतर राहण्याची सोय कुठे होऊ शकते, कोणते शिक्षण घ्यावे, कोण शिक्षण पुरवू शकते, सरकारी योजना कोणत्या तसेच या युवकांसाठी कोणत्या सामाजिक संस्था काम करतात याची माहिती मिळू शकणार आहे. १८ वर्षानंतर या युवकांना राहण्याची व शिक्षणाची सुविधा ६ शासकीय व १ स्वयंसेवी वसतिगृहामध्ये आहे. तिथे ते २१ वर्षे होई पर्यंत राहू शकतात. तसेच त्यांना शिक्षण , रोजगाराभिमुख व्यवसायीक व तांत्रिक प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण आदींवर भर देण्यात येतो. ही माहिती महिला व बाल विकास आयुक्तालयाने दिली.

Web Title: The life of the youth who have left the reformatory will get a new direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.