यवतमधील ऑक्सिजन प्लांट कोरोना रुग्णांसाठी जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:40+5:302021-04-24T04:09:40+5:30

एरवी तितकेसा महत्त्वचा न वाटणारा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प आताच्या कोरोना संकटात त्याचे महत्त्व पटवून देत आहे. संपूर्ण दौंड तालुक्यात अवघा ...

Lifeline for patients with oxygen plant corona in Yavat | यवतमधील ऑक्सिजन प्लांट कोरोना रुग्णांसाठी जीवनवाहिनी

यवतमधील ऑक्सिजन प्लांट कोरोना रुग्णांसाठी जीवनवाहिनी

Next

एरवी तितकेसा महत्त्वचा न वाटणारा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प आताच्या कोरोना संकटात त्याचे महत्त्व पटवून देत आहे. संपूर्ण दौंड तालुक्यात अवघा एक प्रकल्प यवतमध्ये आहे. गुरुदत्त इंटरप्रायजेस नावाने सुरू असणाऱ्या प्रकल्पातून आठ ते दहा टन ऑक्सिजननिर्मिती होऊ शकते. द्रव रूपातील ऑक्सिजनपासून मेडिकल वापरासाठी वायू रूपातील ऑक्सिजन येथे निर्मित करून लहान-मोठ्या सिलिंडरद्वारे रुग्णालयात पोहचवला जातो.

मात्र द्रव स्वरूपातील ऑक्सिजनचा पुरवठा सद्य परिस्थिती कमी प्रमाणात होत आहे. रोज केवळ चार ते पाच टन द्रव ऑक्सिजन ठाणे, चाकण व डोलवी येथून मिळत आहे. आयनोक्स एअर प्रॉडक्ट कंपनीमधून द्रव ऑक्सिजनचा पुरवठा येथे केला जातो. सध्या उपलब्ध होणाऱ्या द्रव ऑक्सिजनपासून ४५० ते ५०० सिलिंडर ऑक्सिजन उत्पादित होत आहे. दौंड आणि हवेली तालुक्यासाठी हा ऑक्सिजन पुरेसा नसून रोज पुरेसा द्रव ऑक्सिजन मिळाल्यास दोन्ही तालुक्यात पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन या प्रकल्पातून उत्पादित केला जाऊ शकतो.

ऑक्सिजन पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने दौंड व हवेली तालुक्यात वाद निर्माण झाला असून, दोन्ही तालुक्यात पुरेसा ऑक्सिजन देता यावा यासाठी द्रव ऑक्सिजन पुरवठा वाढवणे आवश्यक आहे.

चौकट :-

ऑक्सिजन निर्मितीसाठी दोन प्रकारचे प्रकल्प असतात. यातील एका प्रकल्पात द्रव रूपातील ऑक्सिजन वायूरूपात आणून मेडिकल वापराच्या सिलिंडरमधून पुरवठा करणे. तर दुसऱ्या प्रकल्पात हवेतील ऑक्सिजन शोषून मेडिकल वापराच्या सिलिंडरमधून पुरवठा करणे. मात्र हवेतील ऑक्सिजन शोषून सिलिंडरमध्ये भरण्याचा प्रकल्प मोठा खर्चीक असल्याने याचबरोबर प्रक्रिया किचकट असल्याने असे प्रकल्प कमी प्रमाणात आहेत. तरी सध्या जेथे असे प्रकल्प आहेत तेथे ऑक्सिजन उत्पादन करणे सोपे जात आहे.

यवत येथील प्रकल्पातून दौंड व पूर्व हवेली भागातील रुग्णालयाची आवश्यकता आहे, तेवढा मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. मात्र त्यासाठी द्रव स्वरूपातील ऑक्सिजन दररोज पुरेश्या प्रमाणात मिळणे गरजेचे आहे. सद्या द्रव ऑक्सिजन मिळत नसल्याने आम्हीदेखील हतबल असल्याची प्रतिक्रिया गुरुदत्त इंटरप्रायजेसचे चालक अविनाथ खेडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Lifeline for patients with oxygen plant corona in Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.