लेखक अनिल अवचट यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 12:22 IST2017-12-21T12:19:05+5:302017-12-21T12:22:51+5:30
महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

लेखक अनिल अवचट यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे : अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यंदा लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार तर मराठवाड्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार अरविंद गुप्ता यांना दिला जाईल. १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे सभागृहात पुरस्कार वितरण होईल.
याशिवाय, सई परांजपे यांच्या 'सय : माझा कलाप्रवास' या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार आणि कल्पना दुधाळ यांच्या 'धग असतेच आसपास' या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार दिला जाणार आहे. अजित दळवी यांना 'समाजस्वास्थ्य' या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपूरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती विनोद शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.