वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:24 PM2017-12-20T19:24:53+5:302017-12-20T19:29:04+5:30

ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारूती चितमपल्ली यांनी यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

'Lifetime Achievement Award' announced Wildlife Wizard and Former Samelan President Maruti Chitampalli | वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

Next
ठळक मुद्दे४ ते ८ जानेवारी या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या वतीने महोत्सवाचे आयोजन

पुणे : ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारूती चितमपल्ली यांनी यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ४ ते ८ जानेवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर आणि नेहरु सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव आणि अध्यक्ष माधव चंद्रचूड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शैलजा देशपांडे, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य उपस्थित होते. 
किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या वतीने हा महोत्सव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सी. एम. एस. वातावरण, महाराष्ट्र साहित्य परिषद, सागरमित्र, जीवित नदी, जलबिरादारी, पगमार्क्स, लोकायत यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी महोत्सवाचा विषय ‘प्रदूषण टाळा, नदी वाचवा’ हा असून एकूण ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  इको बझार हे यंदाचे विशेष आकर्षण असणार आहे. महोत्सव दरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले २८ देशांतील १५५ चित्रपट, लघुपट, निवडक चित्रपट दिग्दर्शक प्रेक्षकांसोबत मुक्त संवाद, छायाचित्र स्पर्धा, नदी संदर्भातील कार्यशाळा असे विविध कार्यक्रम होणार आहे. 
 महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून ‘वसुंधरा मित्र’सन्मान वितरण तसेच चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता ‘रिव्हर वॉक’, ११ वाजता ‘इको बझार’चे उद्घाटन, दुपारी २ वाजता महाविद्यालयीन कार्यक्रम, ५.३० वाजता चित्रपट आणि ६ वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि कार्यशाळा असे कार्यक्रम होणार आहेत. ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन, तसेच शाळा आणि महाविद्यालयीन कार्यक्रमांची रेलचेल असेल. ७ जानेवारी रोजी रिव्हर अ‍ॅक्शन, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, चर्चासत्र, चित्रपट तसेच जीसीसीसी ट्रॉफी पारितोषिक वितरण होणार आहे. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचा समारोप, पुरस्कार वितरण आणि समारोपाचा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 

Web Title: 'Lifetime Achievement Award' announced Wildlife Wizard and Former Samelan President Maruti Chitampalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे