प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:38+5:302021-06-16T04:15:38+5:30
राज्यातील सुमारे १७ हजार प्राध्यापकांच्या व ११ हजार ५०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागांबाबत येत्या ३० जूनपर्यंत ...
राज्यातील सुमारे १७ हजार प्राध्यापकांच्या व ११ हजार ५०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागांबाबत येत्या ३० जूनपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने २०१८ मध्ये सहायक प्राध्यापकांच्या ३ हजार ५८० रिक्त जागांवर सुमारे दीड हजार प्राध्यापकांच्या नियुक्त्या केल्या. गेल्या काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या जागासुद्धा रिक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबतही शासनाने ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे कृषी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक बेरोजगार झाले आहेत. तसेच पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उद्ध्वस्त होत आहे.
राज्य शासनाने ३० जूनपर्यंत प्राध्यापक भरतीबाबत गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय न घेतल्यास पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासह राज्यातील सर्व कार्यालयांसमोर बेमुदत उपोषण केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे.