धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:25+5:302021-07-15T04:10:25+5:30
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संत हे समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी व समाजातील एकोपा वाढवण्यासाठी कार्य करत असतात. ...
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संत हे समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी व समाजातील एकोपा वाढवण्यासाठी कार्य करत असतात. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यक्रमांवर असलेली बंदी तत्काळ उठवली जावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना भेटून देण्यात आले. या वेळी हभप नवनाथ महाराज माशेरे, हभप सुभाष महाराज गावडे, हभप रमेश महाराज टिळेकर आणि कीर्तनकार, गायक, वादक उपस्थित होते.
--
चौकट
--
संतसाहित्य हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे आहे, कोविडच्या कालखंडात माणसाचे मनोधैर्य, मानसिकता, इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार वाढवायचे असेल तर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणे गरजेचे आहे, अशी मागणी हभप नवनाथ महाराज माशेरे, कार्याध्यक्ष शिरुर तालुका वारकरी संप्रदाय यांनी केली.
फोटो
शिरूर वारकरी संप्रदायाचे वतीने तहसीलदार लैला शेख यांना निवेदन देण्यात आले.