शनिवारवाडा प्रांगणात 51 फुटी स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 02:46 PM2018-06-06T14:46:44+5:302018-06-06T14:46:44+5:30
पुण्यातील शनिवारवाडा प्रांगणात 51 फुटी स्वराज्यगुढी उभारुन ढाेल-ताशांच्य गजरात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात अाला.
पुणे : ढाेल-ताशांच्या गजरात, 51 फुटी स्वराज्यगुढी उभारत 345 वा शिवराज्याभिषेक दिन शनिवारवाड्यावर माेठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला. शिवजयंती महाेत्सव समितीच्या वतीने या साेहळ्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघाेषाने संपूर्ण शनिवारवाडा परिसर दुमदूमुन गेला हाेता.
या साेहळ्याला महापाैर मुक्ता टिळक, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, धर्मराज हांडे महाराज, समितीचे संस्थापक अध्यक्ष व स्वराज्य गुढीचे संकल्पक अमित गायकवाड यांसह असंख्य पुणेकर उपस्थित हाेते. शिवजन्माेत्सव स्वराज्यरथ साेहळ्यातील सर्व स्वराज्य घराणी यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींचा जिरेटाेप, शिवमुद्रा, सुवर्णहाेन, वाघनखे अाणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभारण्यात अाली. फर्जंद सिनेमातील कलाकार देखील यावेळी उपस्थित हाेते.
महापाैर मुक्ता टिळक व इतर महिलांच्या हस्ते गुढीची पुजा करण्यात अाली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघाेष करत 51 फुटी गुढी दिमाखात उभारण्यात अाली. यावेळी बाेलताना मुक्ता टिळक म्हणाल्या, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा 345 वा राज्याभिषेक दिन रायगड, पुण्यासह संपूर्ण देभरात उत्साहात साजरा हाेत अाहे. शिवराज्याभिषेक दिन स्वराज्य दिन म्हणून सर्वत्र साजरा व्हावा यासाठी अाम्ही निश्चित प्रयत्न करु असे अाश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अमित गायकवाड म्हणाले, शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 राेजी हिंदवी स्वराज्य स्थापन करुन भारताच्या गाैरवशाली संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण केले हाेते. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाचे अनन्य साधारण महत्व देशवासियांना समजावे, याकरीता 6 जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्यदिन म्हणून जाहीर करावा. शिवराज्याभिषेक मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात ही संकल्पना समितीतर्फे अाम्ही राबविण्याचे अावाहन केले हाेते. याला पुणेकरांनी माेठा प्रतिसाद देत घराघरात शिवराज्याभिषेक साजरा करण्यात अाला.
या साेहळ्याचे यंदाचे 6 वे वर्ष असून शिवगर्जना, नादब्रम्ह ट्रस्ट, नूमवी, जय शिवराय, सह्याद्रीगर्जना, रुद्रगर्जना, शिवनेरी ही पुण्यातील नामांकीत ढाेलताशा पथके वादनात सहभागी झाली हाेती. यावेळी अमित गायकवाड यांनी रचलेली श्री शिवछत्रपतींची अारती देखील म्हणण्यात अाली.