Pune Rain | जेजुरी परिसरात हलका पाऊस, मात्र विजांचा कडकडाट; शेतकऱ्यांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 08:07 PM2023-03-07T20:07:44+5:302023-03-07T20:09:03+5:30
गहू, कांदा, हरबरा पिके धोक्यात येण्याची शक्यता...
जेजुरी (पुणे) :जेजुरी परिसरात सोमवारी (दि. ६) रात्रीपासून ढगाळ वातावरण होते तर मंगळवारी (दि. ७) विजेच्या प्रचंड कडकडाटासह हलकासा पाऊस पडला. कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे हाता-तोंडाशी आलेली गहू, कांदा, हरबरा पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतित आहे.
जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला कडेपठार डोंगरानजीक असणाऱ्या पवारवाडीमध्ये भरत पवार यांच्या शेताच्या बांधावर मोठा कडकडाट होत वीज कोसळली. यावेळी मोठा आवाज आणि धूर निघाल्याचे पवार यांनी सांगितले. सुदैवाने जीवित वा वित्त हानी झाली नाही. मात्र, ज्या ठिकाणी वीज कोसळली तेथे फूट - दीड फुटांचा खड्डा झाला. ही घटना मंगळवारी (दि. ७ ) सकाळच्या सुमारास घडली.