Pune: पुणे शहर परिसरात हलक्या सरी; पुढच्या चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 06:44 PM2023-06-16T18:44:41+5:302023-06-16T18:47:39+5:30

राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी तो कोकणात रेंगाळला आहे...

Light showers in Pune areas; Chance of rain with thunder in next four days | Pune: पुणे शहर परिसरात हलक्या सरी; पुढच्या चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Pune: पुणे शहर परिसरात हलक्या सरी; पुढच्या चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

googlenewsNext

पुणे :पुणे शहरात सायंकाळच्या सुमारास काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. यामुळे शहरातील वातावरण आल्हाददायी झाले. शहरातील डेक्कन, नळ स्टॉप, म्हात्रे ब्रीज परिसर, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रोड, शिवाजीनगर, औंध, बानेर, पाषाण, विश्रांतवाडी, हडपसर, धायरी आणि शहरातील पेठ परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या

राज्यात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी तो कोकणात रेंगाळला आहे. अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. कोकण साेडला तर इतर राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामानशास्त्र विभागाने २३ जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

मॉन्सूनचे ८ जून रोजी केरळला धडक मारली. यंदा तो उशीरा आला तरी अजूनही म्हणावा तसा दमदार बरसलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा निराश झालेला आहे. राज्यात पुढच्या ४,५ दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी पुढील चार आठवड्याचा अंदाज दिला आहे. त्यामध्ये २३ जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पाऊस नसल्याने पेरण्याही झालेल्या नाहीत. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असा अंदाज यापूर्वीच कृषी हवामानशास्त्रज्ञांनी दिलेला आहे.

बिपरजॉय या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पावसावर काहीही परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे. आज कोकणातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पावसासाठी अजूनही तरी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Light showers in Pune areas; Chance of rain with thunder in next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.